मालेगाव: मालेगावात सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरच्या हल्ल्याचा निषेध, फुले-शाहू-आंबेडकर अनुयायांसह सर्व राजकीय संघटनांचा निषेध
मालेगावात सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरच्या हल्ल्याचा निषेध, फुले-शाहू-आंबेडकर अनुयायांसह सर्व राजकीय संघटनांचा तीव्र संताप आज दिनांक 10 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर वकील राकेश किशोर यांनी केलेल्या हल्ल्याचे पडसाद मालेगावात उमटले. फुले, शाहू, आंबेडकर विचारांचे अनुयायी आणि विविध राजकीय संघटनांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, एकात्मता चौक येथे जोरदार निदर्शने करण्यात आली.