रावेर तालुक्यातील वाघोदा या मूळगावी कुटुंब देवदर्शनासाठी गेलेले असताना शिवकॉलनीतील घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोख चार हजार रुपयांसह सोने-चांदीचे दागिने असा एकूण एक लाख ४८ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना शनिवारी २० डिसेंबर रोजी रात्री उघडकीस आली. या प्रकरणी रविवारी २१ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता रामानंद नगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.