कामठी: अवघ्या तीन दिवसांत दुसरा खून: कामठीत धुलीवंदनच्या दिवशी रक्ताचा सडा, हॉर्न वाजवल्याने तरुणाची हत्या
शहरात धुलीवंदनाचा आनंद साजरा होत असतानाच एका क्षुल्लक वादातून तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गाडीचा हॉर्न वाजवल्याच्या कारणावरून झालेल्या वादात एका २७ वर्षीय तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान तीन दिवसात दोन खून झाल्याने कामठी शहर हादरले आहे.मृत तरुण रवी शिवकुमार अगुठलेवार हा आपल्या मित्रासोबत कारने घोरपडहून घराकडे परतत होता. आरोपी अक्षय कुमार धनराज गेडाम हा आपल्या नातेवाईकांकडे होळी साजरी करून पायी घरी जात होता.