पुणे शहर: सदाशिव पेठेत दरोडा; ६० वर्षीय व्यक्तीकडून १.३० लाखांची लूट.
Pune City, Pune | Oct 18, 2025 – सदाशिव पेठेतील महाराणा प्रताप उद्यानाजवळ साडेदहा वाजता ६० वर्षीय व्यक्तीला लुटल्याची घटना घडली. फिर्यादी मेहता पब्लिकेशनसमोरून जात असताना मोपेडवरील दोन अनोळखी इसमांनी त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यानंतर फिर्यादीला खाली पाडून लोखंडी हत्याराचा धाक दाखवत डिकीत ठेवलेली १ लाख ३० हजार रुपयांची रोकड हिसकावून ते पसार झाले. खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून आरोपींचा शोध सुरू आहे.