दिग्रस: दिग्रस पोलिसांकडून माहिती अधिकार दिनानिमित्त दिग्रसच्या राष्ट्रीय आणि दिनबाई शाळेतील विद्यार्थ्यांना जनजागृती
माहिती अधिकार दिनाचे औचित्य साधून आज दि. २९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान दिग्रस पोलिस स्टेशनच्या वतीने जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. दिग्रस येथील दीनबाई विद्यालयात पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांनी विद्यार्थी व विद्यार्थिनींना माहिती अधिकाराबाबत सखोल मार्गदर्शन केले. सोबतच दिग्रसच्या राष्ट्रीय विद्यालय येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गुंडे व उपनिरीक्षक देशमुख यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.