लाखनी: "आम्ही जेलमधून आलोय, सोडणार नाही!"; पोहरा येथे दोन गुंडांचा मेश्राम कुटुंबियांवर पेट्रोल हल्ला
किरकोळ वादातून दोन सराईत गुन्हेगारांनी एका विवाहित महिलेसह तिच्या पतीवर आणि मध्यस्थी करायला आलेल्या पुतण्यावर पेट्रोल ओतून त्यांना जिवंत जाळण्याचा थरारक प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना मौजा पोहरा (राजीवनगर) येथे घडली. ९ जानेवारीच्या सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास पोहरा येथील फिर्यादी महिला (४६) आणि तिचे पती विलास मेश्राम हे पायी जात असताना, रस्त्यात मोटारसायकल उभी करून पेट्रोल भरणाऱ्या धम्मराज नेमीचंद मेश्राम (३२) आणि भीमराज नेमीचंद मेश्राम (२९, रा. सेलोटी) यांना गाडी बाजूला करण्यास सांगि