माहूर तालुक्यातील बामनगुडा येथील शेत शिवारामध्ये कापूस वेचणाऱ्या एका महिलेवर एका वन्यप्राण्याने हल्ला केल्याची घटना आजरोजी दुपारी 2 च्या सुमारास घडली होती, या हल्ल्यात लता सुरेश तोडसाम वय 35 वर्ष ही महिला गंभीररित्या जखमी झाली होती यात तिचा चेहरा विद्रुप झाला होता पण ती सुदैवाने बचावली होती, सदर महिलेस सिंदखेड येथे प्राथमिक उपचारानंतर पिढीला उपचारासाठी यवतमाळ येथे नेण्यात आले आहे. वरील महिलेवर हल्ला करणारा वन्य प्राणी बिबट्या की अस्वल याचा शोध वन विभाग हे घेत आहेत.