जालना: जालना शहरात गॅस सिलिंडरमधून गॅस चोरीचा प्रकार उघड; मनसे पदाधिकाऱ्यांची घटनास्थळी धाव
Jalna, Jalna | Apr 5, 2026 जालना शहरातील बजरंग दाल मिल परिसरात घरपोच गॅस वितरण करणाऱ्या रिक्षामधून गॅस सिलिंडरमधील गॅस कमी करून दुसऱ्या सिलिंडरमध्ये भरला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित गॅस एजन्सीच्या रिक्षामधून नागरिकांच्या घरापर्यंत गॅस सिलिंडर पोहोचवले जात होते. मात्र, काही दिवसांपासून नागरिकांना सिलिंडरमध्ये एक ते दोन किलोपर्यंत गॅस कमी असल्याचा संशय येत होता. याच दरम्यान स्थानिक नागरिकांनी काही संशयास्पद हालचाली पाहिल्यानंतर हा प्रकार