अकोल्यातील मूलभूत सुविधांची दयनीय अवस्था आणि भ्रष्टाचारामुळे शहराचा विकास ठप्प झाल्याचा आरोप जमाअत-ए-इस्लामी हिंद, अकोला शाखेने पत्रकार परिषदेत केला. कोट्यवधी रुपये खर्च होऊनही स्वच्छता, रस्ते व वाहतूक व्यवस्था कोलमडल्याचा आरोप करत त्यांनी गरीब वस्त्या, झोपडपट्ट्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाल्याचे म्हटले. दामले चौक–अकोट स्टँडसह अनेक रस्त्यांवरील खड्ड्यांवर त्यांनी संताप व्यक्त केला. वाहतूक कोंडी, अतिक्रमण आणि 'लूट' शुल्क रद्द करण्याची मागणी करत प्रशासनाने निष्पक्ष कारवाई करावी, असे त्