एमआयडीसीतील कंपनीत सुरू असलेले फायर फायटर सिस्टीमचे काम बंद पाडत काम सुरू ठेवण्यासाठी पाच लाखांच्या खंडणीची मागणी करण्यात आली आहे तसेच माझ्या परवानगीशिवाय काम सुरू केले तर कामगारांना कोराडीने हातपाय तोडत जिभे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार सुपा एमआयडीसी परिसरात घडला आहे याबाबत अंजली दत्तात्रय येवले यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे