जालना: बकरी ईदपूर्वी कदीम जालना पोलिसांची मोठी कारवाई; कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या 20 बैलांची सुटका
Jalna, Jalna | May 27, 2026 बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कत्तलीसाठी निर्दयतेने डांबून ठेवण्यात आलेल्या 20 गोवंशीय जनावरांची कदीम जालना पोलिसांनी धडक कारवाई करत सुटका केली. बुधवार दि. 27 मे 2026 रोजी दुपारी 1 वजाता मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सुमारे 6 लाख 95 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दि. 26 मे 2026 रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास मोरंडी मोहल्ला, जुना जालना येथे मुजम्मील व गफार कुरेशी यांच्या वाड्यात गोवंशीय जनावरे कत्तलीसाठी आणले होते.