साधारणतः फेब्रुवारी-मार्चमध्ये बाजारात येणारे ताडगोळे यंदा जास्त पावसामुळे नोव्हेंबर-डिसेंबरमध्येच विक्रीस आले आहेत. रसायनीसह मोहोपाडा परिसरात ताडगोळ्यांची आवक वाढली असून नागरिकांकडून खरेदीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पालघर जिल्ह्यातून हे ताडगोळे येथे विक्रीस आले असून सध्या अंदाजे 90 ते १०० रुपयांना सहा ताडगोळे असा दर आहे.