जळगाव: अनुराग स्टेट बँक कॉलनीत ट्रॅक्टर उलटल्याने चालकाचा दबुन मृत्यू प्रकरणी रामानंद नगर पोलीसात गुन्हा दाखल
जळगाव शहरातील अनुराग स्टेट बँक कॉलनी येथे सिमेंटचे ट्रॅक्टरचा लोखंडी रॉड अचानक तुटल्याने चालक गणेश मोरसिंग चव्हाण वय ४७ रा. मयुर कॉलनी, जळगाव यांचा ट्रॅक्टरखाली दबुन दुदैवी मृत्यू झाल्याची घटना १२ सप्टेंबर रोजी घडली होती. याप्रकरणी अखेर मंगळवारी १६ सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.