अकोट: मालमत्ता कर भरण्यासाठी पालिका निवडणुकीतील इच्छुकांची नगरपालिकेत गर्दी
Akot, Akola | Nov 12, 2025 नगरपालिका निवडणुकीतील इच्छुकांची मालमत्ता कर भरण्यासाठी नगरपालिकेच्या कर विभागात लगबत दिसून येत असून या ठिकाणी निवडणुकीतील इच्छुक उमेदवारांना नगरपालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करत असताना कुठलीही थकबाकी नसावी यासाठी मालमत्ता कर पाणी यासह इतर शासकीय थकीत कराचा भरण्या करण्यासाठी विविध शासकीय विभागासह नगरपालिकेतील मालमत्ता कर विभागात देखील गर्दी दिसून येत आहे नगरपालिका निवडणुकीत उमेदवार सध्या निवडणूक अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या टप्प्यात व्यस्त असल्याचे दिसत आहे