कर्जत: घरातील किरकोळ वादातुन चार जणांना गंभिर स्वरूपाची मारहाण..@raigadnews24
Karjat, Raigad | Oct 11, 2025 पहाटेच्या वेळी घराचा दरवाजा तोडून, घरात घुसून घरातील चार जणांना गंभिर स्वरूपाची मारहाण करण्यात आल्याची घटना रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात घडली आहे. धाकटे वेणगाव येथील हि शिंदे कुटूंबातील मारहाणीची घटना असून यामध्ये प्रतिक शिंदे, सतिष शिंदे, प्रफुल्ल शिंदे आणि प्रतिभा शिंदे हे चौघे जण जखमी झाले आहेत. पोलिस ठाण्यात दाखल तक्रारी नुसार आरोपी किरण शिंदे, मंगेश जाधव, जय साबळे आणि इतर दोन अनोळखी तरुणांनी फिर्यादी प्रतिक शिंदे यांच्या घराचा दरवाजा पहाटेच्या सुमारास तोडून घरात प्रवेश केला