सेनगाव: गोरेगांव-आजेगांव रस्त्याच्या कडेला उभी असलेली दुचाकी लंपास,अज्ञातावर गोरेगांव पोलिसात गुन्हा दाखल
सेनगांव तालुक्यातील गोरेगांव ते आजेगांव रस्त्यावरील रोडच्या बाजूला उभी केलेली मोटार सायकल अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली असून याप्रकरणी फिर्यादी कैलास गंगाराम जगताप राहणार धनगरवाडी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीवर गोरेगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची घटना दिनांक 12 सप्टेंबर रोजी 11 ते 2 वाजण्याच्या दरम्यान घडली असून मोटार सायकल क्रमांक एम एच 38 ए जी 11 84 हिरो होंडा स्प्लेंडर प्लस कंपनीची किंमत अंदाजे 80 हजार आहे.