जालना: जालना बसस्थानक परिसरातून दोन अल्पवयीन मुली बेपत्ता; अज्ञात व्यक्तीकडून फूस लावून नेल्याचा संशय
Jalna, Jalna | Apr 18, 2026 जालना शहरातील लोहार मोहल्ला, बसस्थानक परिसरातून दोन अल्पवयीन मुली संशयास्पदरीत्या बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. शनिवार दि. 18 एप्रिल 2026 रोजी रात्री 8 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या मुलींना अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय. मिळालेल्या माहितीनुसार, मुलींच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.