वरोरा: भरधाव वेगाने जाणाऱ्या टॅंकरची स्कुटीला मागून धडक;१ ठार १ जखमी;शेगाव पोलीस स्टेशन समोरील घटना
भरधाव वेगाने जाणाऱ्या टॅंकरने वरोरा तालुक्यातील शेगाव पोलीस स्टेशन समोर राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई वर पेट्रोल टॅंकर ने स्कुटीला मागून धडक दिल्याने दुचाकी वरील पाठीमागे बसलेल्या महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दि १६ सप्टेंबर ला सकाळी ९ वा. शेगाव येथे घडली.वरोरा येथील कातोरे कुटुंब सकाळी आपल्या स्कुटीने भिवापूर तालुक्यातील सेलोटी या ठिकाणी तेरवीच्या कार्यक्रमाला जात असताना शेगाव पोलीस स्टेशन समोर हा अपघात घडला,कोमल कातोरे वय ३३ वर्षे रा. गांधी वॉर्ड वरोरा असे मृत महिलेचे नाव आहे.