अकोला: अकोला कृषि उत्पन्न बाजार समितीत मुग व तूर तेजीत; दरांत लक्षणीय वाढ
Akola, Akola | Dec 2, 2025 अकोला कृषि उत्पन्न बाजार समितीत दिनांक 2 डिसेंबर 2025 रोजी मुग आणि तूरच्या दरांत लक्षणीय तेजी दिसून आली. मुगचा भाव ३५०० ते ६५०० तर तूरचा दर ६२०० ते ६८०५ रुपयांपर्यंत पोहोचला. गहू 2200–2590, ज्वारी 2100–2380, चणा 4900–5275, सोयाबीन 3700–4435, उडीद 3900–4900 आणि पांढरा चणा 2800–4500 या दराने व्यवहार झाले. हे दर दुपारी 2 वाजेपर्यंतचे असल्याची माहिती धान्य विभाग प्रमुख सुनील ठोकळ यांनी दुपारी 5 वाजता दिली.