भंडारा: शहरातील मुस्लीम लायब्ररी चौक येथे ट्रॅक्टरमधून २ बॅटऱ्या चोरी: भंडारा पोलिसांत गुन्हा दाखल
भंडारा शहरात २ ट्रॅक्टरमधून २ बॅटऱ्या चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी भंडारा पोलिसांनी अज्ञात महिला चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. साकीब उद्दीन खान नजब उद्दीन खान (वय ४८, रा. अंसारी वार्ड, भंडारा) यांच्या मालकीचे एम.एच. ३६ झेड ३९३२ आणि एम.एच. ३६-६३६६ क्रमांकाचे दोन महिंद्रा ट्रॅक्टर देशकर नर्सिंग होम, रिलायन्स ट्रेडर्सजवळ, मुस्लीम लायब्ररी चौक येथे पार्किंगसाठी उभे होते. २१ ऑगस्ट २०२५ रोजी पहाटे ४.३० ते ५.३० वाजेच्या दरम्यान ही चोरी झाली.