सेनगाव: गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती कार्यालय समोर 5 डिसेंबर रोजी बेमुदत आमरण उपोषण,प्रहारचे जिल्हाध्यक्ष विजय वानखेडे
प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख विजय वानखेडे यांनी विविध मागण्यासाठी पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण छेडण्याचा इशारा दिला आहे. सेनगाव तालुक्यातील काही शिक्षक हे मुख्यालयी न राहता शासनाची दिशाभूल करून घरभाडे उचलत असल्यामुळे अशा शिक्षकांची चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी प्रहारचे जिल्हाध्यक्ष विजय वानखेडे यांनी केली असून दखल न घेतल्यास दिनांक 5 डिसेंबर रोजी गटशिक्षणाधिकारी कार्यालय पंचायत समिती समोर बेमुदत आमरण उपोषण छेडण्याचा इशारा दिला.