दिग्रस: भारत पाकिस्तानची क्रिकेट मॅच हा ऑपरेशन सिंदूरचा अपमान, ठाकरे गटाचे दिग्रसच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आंदोलन
पाहलगाम येथे निष्पाप लोकांचे जीव घेणाऱ्या पाकिस्तानसोबत संबंध ठेवू नयेत, तसेच दुबई येथे आज १४ सप्टेंबर रोजी होणारा भारत–पाक सामना रद्द करावा, अशी मागणी करत शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांच्यावतीने दिग्रस येथे आज दि. १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान निदर्शने करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या या आंदोलनात ठाकरव गटाच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तानविरोधात घोषणाबाजी केली. ठाकरे गटाने इशारा दिला की, जर सामना झाला तर तो ऑपरेशन सिंदूर शहीदांचा अपमान ठरेल.