टॉवर चौक ते अशोक वाटिका पर्यंत विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ५ डिसेंबर २०२५ रोजी मध्यरात्री 12 वाजता टॉवर चौकातून कँडल मार्च काढून अभिवादन करण्यात आले. अशोक वाटिकेत बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर मेणबत्त्या लावून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. भारतीय बौद्ध महासभा, वंचित बहुजन आघाडी, महिला व युवक आघाडी, फुले-आंबेडकर विद्वत सभा, सम्यक विद्यार्थी आंदोलनसह विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.