भंडारा शहरातील प्रभाग क्रमांक १४ मध्ये राशी आशिष दलाल यांच्या पुढाकाराने ६० हून अधिक महिलांनी उत्साहाने शिवसेनेत प्रवेश करत पक्षाच्या बळकटीत लक्षणीय भर घातली आहे. महिला सशक्तीकरणाचा ठाम संदेश देत या सर्व महिलांनी शिवसेनेच्या विचारांवर दृढ विश्वास व्यक्त केला, तसेच समाजसेवा आणि जनकल्याणासाठी समर्पित भावनेने कार्य करण्याचा पवित्र संकल्प केला. या महत्त्वपूर्ण प्रवेशामुळे प्रभागातील शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, स्थानिक स्तरावर पक्षाची संघटनात्मक ताकद व महिलांचा आधार अधिक मजब