दर्यापूर: पो.स्टे.हद्दीत कॉलेजला जाणाऱ्या अल्पवयीन मुलीची छेडछाड दमदाटीचा प्रयत्न;दर्यापूर पोलिसात गुन्हा दाखल
दर्यापूर शहरात घडलेल्या धक्कादायक घटनेत कॉलेजला जाणाऱ्या १७ वर्ष ९ महिन्यांच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिच्याशी दमदाटी केल्याप्रकरणी पोलिसांनी आज दुपारी १२ वाजता आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.सविस्तर माहिती अशी की, पीडिता ही कॉलेजला जाण्यासाठी गावच्या नाक्यावर ऑटोची वाट पाहत असताना आरोपी हा तिच्या मावस भावाच्या नावाने आला. "मी तुला दर्यापूर सोडून देतो" असे म्हणत तिला आपल्या वाहनामध्ये बसवून घेतले.