नागपूर शहर: विनोबा भावेनगर येथे युवकाच्या संशयित मृत्यू ;पोलिसांचा तपास सुरू
22 ऑक्टोबरला दुपारी 5 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार पोलीस ठाणे यशोदा नगर अंतर्गत येणाऱ्या विनोबा भावे नगर येथे एका युवकाचा संशयित मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृतक मुलाचे नाव शुभम निमजे असे सांगण्यात आले आहे घटनेची माहिती मिळताच यशोधरा नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश खुणे आपल्या टीम सह घटनास्थळी पोहोचले. या प्रकरणाचा पुढील तपास यशोधरा नगर पोलिसांनी सुरू केला आहे.