बीड तालुक्यातील ढेकणमोहा गावातील रहिवासी हरिभाऊ भिकाजी थापडे (वय 39) यांचे झालेल्या अपघातात दुःखद निधन झाले. ही घटना गोरक्षनाथ टेकडी फाट्याजवळ घडली असून, गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तत्काळ बीड येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, हरिभाऊ थापडे हे घाटसावळी वरून ढेकणमोहा कडे येत असताना अचानक झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाले. हरिभाऊ थापडे हे मनमिळावू आणि समाजकार्यात सक्रिय व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात होते