कंधार तालुक्यातील चिखली येथे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते आज दुपारी विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार मुदिराज, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता सुमित पाटील, माजी सरपंच सचिन पाटील चिखलीकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नांदेड उत्तर विधानसभा अध्यक्ष संतोष क्षिरसागर. अर्जुन क्षिरसागर, जीवन प्राधिकरणचे उपअभीयंता डावकोरे, महावितरणचे उपअभियंता मठपती, जिल्हा परिषद शाखा अभियंता आनंद कचरे यांच्यासह अनेकांची यावेळी उपस्थित होती.