दिग्रस: नगर परिषद निवडणुकीत मतदान संपन्न; तीन केंद्रांवर रात्री ८ वाजेपर्यंत मतदान
दिग्रस नगर परिषदेची निवडणूक आज दि.२ डिसेंबर रोजी १८ इमारतींमधील ४४ मतदान केंद्रावर पार पडली. एकूण १२ प्रभागांतील २२ नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष पदासाठी सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० या वेळेत मतदानाची प्रक्रिया राबविण्यात आली. बहुतेक सर्व प्रभागांत वेळेत मतदान पूर्ण झाले; मात्र प्रभाग क्र. ११ मधील मतदान केंद्र क्रमांक १, २ आणि ३ वर रात्री ८ वाजेपर्यंत मतदान सुरू राहिले. मशीनची धीमी गती आणि मतदारांनी दुपारदरम्यान कमी उपस्थिती दाखविल्याने मतदानाचा तास वाढत गेला.