नागपूर ग्रामीण: महागड्या कारने गोधणीत गाई-गोरं पळवण्याचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अज्ञात आरोपी फरार
गोधणी गावातून एका गोठ्यातील गाई आणि गोरं पळवून नेण्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. येथील रहिवासी राजुजी चंद्रिकापुरे यांच्या गोठ्यात हा प्रकार घडत असताना, त्यांचा मुलगा हर्षल याच्या ही बाब वेळीच लक्षात आली.हर्षलने प्रसंगावधान दाखवल्यामुळे मोठा अनर्थ टळला.