गेवराई: वाळू माफियाला सहकार्य करण्यासाठी 20 हजार रुपयाची लाच घेताना गेवराई येथील हवालदाराला रंगेहात पकडले
Georai, Beed | Nov 8, 2025 कुठलेही टेंडर नसताना खुलेआम अवैध वाळू उपसा केला जात आहे. याप्रकरणी सातत्याने बातम्या प्रकाशित केल्यानंतरही महसूल आणि पोलीस प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. त्यातच वाळूमाफियाला दाखल गुन्ह्यात सहकार्य करण्यासाठी तब्बल 30 हजाराच्या लाचेची मागणी करण्यात आली. तडजोडअंती 20 हजाराची लाच स्विकारताना शनिवारी (दि.8) गेवराई पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदारास बीड एसीबीने रंगेहाथ पकडले आहे. या कारवाईने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. विजय आघाव असे लाचखोर पोलीस हवालदाराचे नाव आहे.