अकोला: जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या विसावा हॉलमधून मोबाईल चोरी
Akola, Akola | Oct 20, 2025 जिल्हा स्त्री रुग्णालयातील विसावा हॉलमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांचे मोबाईल चोरीला जाण्याच्या घटना वाढल्या आहेत. प्रसूतीसाठी खेड्यापाड्यातून येणाऱ्या महिलांसोबत येणारे नातेवाईक येथे मुक्काम करतात. मात्र, सुरक्षा रक्षकांची संख्या जवळपास 100 असतानाही चोरी रोखली जात नाही. 20 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजता एका नातेवाईकाने नाराजी व्यक्त करत ही बाब उजेडात आणली. या घटनांमुळे नातेवाईकांना आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासन मात्र निष्क्रिय आहे.