नगर: : डॉक्टरांना जामीन नाकारला पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष
कोरोना काळात बनावट अहवालाच्या जोरावर व्यक्तीला मृत घोषित केल्याच्या आरोपात उच्च न्यायालयाच्या आदेशावरून शनिवारी तोफखाना पोलीस ठाण्यात अहिल्यानगर शहरातील सहा नामांकित डॉक्टरांसह अनोळखी कर्मचाऱ्यांविरोधात मृत व्यक्तीचा मुलगा अशोक खोकराळे यांनी गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर डॉक्टर पसार झाले असून आज गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टरांपैकी दोन डॉक्टरांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती.