जालना: बोरगाव येथील जि.प. प्रा. शाळेत सातवीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न..
Jalna, Jalna | Apr 26, 2026 बोरगाव येथील जि.प. प्रा. शाळेत सातवीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न.. आज दिनांक 26 रविवार रोजी दुपारी एक वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना तालुक्यातील बोरगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ अत्यंत उत्साहात व भावनिक वातावरणात पार पडला. शालेय जीवनातील पहिला टप्पा पूर्ण करून पुढील प्रवासासाठी सज्ज होताना विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत आनंदासोबतच विरहाचे अश्रूही दिसून आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक व्ही.