पनवेल: रामशेठ ठाकूर सभागृहामध्ये पनवेल, कर्जत, खोपोली, उरण, पेण विभागातील भजनी कलावंतांची सभा
आज रविवार दिनांक २ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ३ च्या सुमारास अखिल भजन संप्रदाय हितवर्धक मंडळ अध्यक्ष भजन सम्राट बुवा भगवान लोकरे यांच्या अध्यक्षतेखाली पनवेल, रामशेठ ठाकूर सभागृहामध्ये पनवेल, कर्जत, खोपोली, उरण, पेण विभागातील भजनी कलावंतांची सभा आयोजित केली होती. उपस्थित मान्यवरांमध्ये भजन सम्राट बुवा निवृत्ती बुवा चौधरी, नारायण बुवा पाटील, दत्ता बुवा ओढंगीकर, गणेश बुवा बंडा अन्य मान्यवर उपस्थित होते. अखिल भजन संप्रदाय हितवर्धक मंडळाची उद्दिष्टे आणि भविष्यात सर्व कलावंतांनी एका छत्राखाली येण्यासाठी भगवान लोकरे बुवांनी आवाहन केले आहे आणि त्याला योग्य प्रतिसाद रायगडच्या कलावंतांनी दिला आहे येत्या काही महिन्यांमध्ये सर्व भजनी कलावंतांना आमंत्रित करून एक मोठी सभा होणार आहे.