अक्कलकुवा: शेतात गुरांनी चारा खाल्ल्याच्या कारणावरून महिलेला मारहाण, कंकाळामाळ सिंदीपाडा येथील घटना
अक्कलकुवा तालुक्यातील कंकाळामाळ सिंदीपाडा शिवारात शेतात गुरांनी चारा खाल्ल्याच्या कारणावरून २१ सप्टेंबर रोजी दुपारच्या वेळेत महिला शेतकरी ला मारहाण करण्यात आली. याप्रकरणी २६ सप्टेंबर रोजी मोलगी पोलीस ठाण्यात पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून मारग्या वळवी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.