वैजापूर: महालगाव येथे पतसंस्था फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न
वैजापूर तालुक्यात सध्या बँकेचे ग्राहक सेवा केंद्र व पतसंस्थावर चोरटे निशाणा साधत आहे वैजापूर शहरातील दोन बँकेचे सेवा केंद्र फोडत चोरट्यांनी रोकड लंपास केल्याची घटना ताजीच असताना तालुक्यातील वीरगाव पोलिस ठाणे हद्दीतील महालगाव येथील एका पतसंस्थेचे गेटचे कुलूप तोडून शटर उचकटून चोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला.या प्रकरणात वीरगाव पोलिसांत सोमवार ता.12 जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे.