जालना: जालना-राजुर रोडवरील गुंडेवाडी बसस्टॅन्ड येथे 24 किलो 700 ग्रॅम गांजासह दोन आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
Jalna, Jalna | Oct 14, 2025 जालना शहरातील गुंडेवाडी बसस्टॅन्ड परिसरात अंमली पदार्थ विक्री करणार्या दोन इसमांना दहशतवाद विरोधी शाखा व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्त कारवाई करून अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून एकूण 24 किलो 700 ग्रॅम मादक पदार्थ गांजा आणि गुन्ह्यात वापरलेले दोन मोबाईल फोन असा एकूण 6 लाख 26 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती मंगळवार दि. 14 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 1 वाजता पोलीस सुत्रांनी दिली.दहशतवाद विरोधी शाखा आणि स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी यांनी कारवाई केली.