महाराष्ट्र नगरपालिका निवडणूक नियम १९६६ मधील नियम १७(१)(ब) नुसार आवश्यक कार्यवाही न झाल्यामुळे नगरपरिषद/नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांपैकी काही जागांसाठीची निवडणूक स्थगित करण्यात आली होती. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाच्या २९ नोव्हेंबर २०२५ रोजीच्या आदेशान्वये सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असल्याचे आज दि ४ डिसेंम्बर ला सायंकाळी ५ वाजता कळविले आहे.