सातारा: सातारा पालिकेच्या छ. शिवाजी महाराज सभागृहात अंतिम प्रभाग रचनेचे
नकाशे प्रसिद्ध
Satara, Satara | Sep 30, 2025 सातारा नगरपालिकेच्या निवडणूकीच्या अनुषंगाने पालिकेच्या छ. शिवाजी महाराज सभागृहात अंतिम प्रभाग रचनेचे नकाशे मंगळवार दि. ३० रोजी सकाळी ११ वाजता प्रसिद्ध करण्यात आले आहेत. त्यात शहरातील २५ प्रभागातील दिशा, प्रभागातील लोकसंख्या, प्रभागातील सर्व माहिती त्या नकाशात दर्शवलेली असून नकाशे पाहण्यासाठी सातारा शहरातील नागरिकांनी आर्वजून हजेरी लावली होती.