मोताळा: घुस्सर फाट्याजवळ चारचाकी वाहनाची मालवाहू वाहनाला धडक, एक जण ठार, चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
मोताळा तालुक्यातील घुस्सर फाट्याजवळ भरधाव वेगात आलेल्या चारचाकी वाहनाने मालवाहू वाहनाला जोरदार धडक दिल्याने मालवाहूच्या चालकाचा मृत्यू झाल्याची घटना 14 सप्टेंबर रोजी रात्री घडली. मृताचे नाव बिस्मिल्ला शाह अय्युब शाह असे आहे. याप्रकरणी मकबुल शाह अय्युब शाह दिलेल्या फिर्यादीवरून चालक प्रशांत किशोर आराख विरुद्ध बोराखेडी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केल्याची माहिती 16 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजता पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.