उत्तर सोलापूर: ग्रामपंचायतींना मिळणार कोट्यवधी रुपयांचे बक्षीस : सीईओ कुलदीप जंगम यांचे आवाहन...
मुख्यमंत्री समृद्ध ग्राम पंचायत राज अभियान अंतर्गत ग्रामपंचायतींना मोठ्या बक्षिसाची घोषणा करण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी विकासकामात उत्कृष्ट कामगिरी केल्यास त्यांना कोट्यवधी रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी ग्रामपंचायतींना बुधवारी सायं 5 वाजता प्रोत्साहन दिले आहे. त्यांनी सर्व ग्रामपंचायत सदस्यांना नव्या योजनांचा प्रकल्प प्रभावीपणे राबवून ग्रामीण विकासात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.