जालना: मोबाईल आणि सोशल मीडियापासून दूर राहून ध्येयाशी एकनिष्ठ राहा – अरविंदराव देशमुख
Jalna, Jalna | May 11, 2026 जालना येथे सर्वपक्षीय छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने स्पर्धा परीक्षा व पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष तथा समितीचे मार्गदर्शक अरविंदराव देशमुख यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करताना यशस्वी जीवनासाठी शिस्त, मेहनत आणि ध्येयाशी निष्ठा आवश्यक असल्याचे सांगितले. यावेळी बोलताना अरविंदराव देशमुख म्हणाले की, आजची तरुण पिढी मोबाईल, व्हॉट्सअॅप, फेसब