कन्नड शहरातील पिशोर नाका येथे लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी मुंडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी झटणाऱ्या आणि वंचितांच्या हक्कासाठी लढणाऱ्या या प्रेरणादायी नेतृत्वाची उजळणी करण्यात आली.यावेळी माजी आमदार उदयसिंग राजपूत यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या विकासदृष्टी व लोकहितकारी कार्यांचा उल्लेख करत नवीन पिढीसाठी ती प्रेरणादायी असल्याचे सांगितले.