पालघर: मोखाडा येथे आढळला तरुणाचा मृतदेह
पालघर जिल्ह्यातील मोखाडा येथे एका तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. मृतदेह नाशिक येथील इगतपुरी तालुक्यातील शरद कोंडाजी बोडके यांचा आहे. अज्ञात व्यक्तींनी त्यांची हत्या करून मृतदेह मध्यवैतरणा नदीपात्रात फेकून दिल्याचा संशय पोलिसांना आहे. जी व्यक्ती मारेकऱ्यांविषयी ठोस माहिती देईल आणि ज्यामुळे गुन्हा उघड किस येईल अशा व्यक्तीला पालघर जिल्हा पोलिसांकडून पन्नास हजार रुपयांचे रोख बक्षीस दिले जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. याप्रकरणी अधिक तपास मोखाडा पोलीस करीत आहेत.