जालना: वाळू माफियांच्या धाकाने कुटुंब भयभीत; मध्यरात्री पोलीस अधीक्षक कार्यालयात घेतला आश्रय
Jalna, Jalna | May 20, 2026 घनसावंगी तालुक्यातील शिरसवाडी येथे वाळू माफियांच्या कथित दहशतीमुळे एक कुटुंब भयभीत झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बुधवार दि. 20 मे 2026 रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार सततच्या त्रासाला कंटाळून आणि जीवाला धोका असल्याच्या भीतीने वसंत वाघमारे यांच्या कुटुंबाने थेट मध्यरात्री पोलीस अधीक्षक कार्यालय गाठत तेथेच आश्रय घेतल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिरसवाडी येथील रहिवासी वसंत वाघमारे यांच्या कुटुंबाला गेल्या काही दिवसांपासून त्रास सुरू आहे.