गोंदिया: 20 हजार रुपयाची लाच घेताना गृहपालला रंगेहात अटक, गोंदिया एसीबीची कारवाई
Gondiya, Gondia | Oct 16, 2025 बिल काढण्याचे नावावर कंत्राटदाराकडून आदिवासी वस्तीगृहाच्या गृहपालाने 20 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराच्या तक्रारीवरून गोंदिया एसीबीने गृहपालाला 20 हजार रुपयाची लाच घेताना रंगेहात अटक करून कारवाई करण्यात आली आहे ही कारवाई दि.15 ऑक्टो.च्या रात्री उशिरापर्यंत करण्यात आली.लाच घेणारे आरोपीचे नाव प्रवीण तळेगावकर पद गृहपाल असे आहे १५ ऑक्टो.ला तक्रारदार यांनी तक्रार दिली.तक्रारदार हे आदिवासी मुलांचे शासकीय वस्तीगृह सडक योजनेतील मुलांना भोजनपुरवठा करणारी कंत्राटदार आहेत.