जालना: प्रवाशांच्या वाढत्या गर्दीमुळे दक्षिण मध्य रेल्वेकडून विशेष गाड्यांच्या सेवेला मुदतवाढ;जालना ते तिरुचेंनुर गाडीचा समावेश
Jalna, Jalna | Apr 15, 2026 प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन तसेच अधिक प्रवास सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाने काही ट्रेन ऑन डिमांड विशेष गाड्यांच्या सेवेला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवार दि. 15 एप्रिल 2026 रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या गाड्या पूर्ववत थांबे व वेळापत्रकानुसारच चालवल्या जाणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. त्यात जालना ते तिरुचेंनुर रेल्वेचा समावेश आहे. मुदतवाढ देण्यात आलेल्या विशेष गाड्यांमध्ये जालना ते तिचेंनुर चा समावेश आहे.