जालना: आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या पाठपुराव्याला यश ; जालना शहरातील विपश्यना केंद्र (भीम पार्क) प्रकल्पाला मुंबईत सकारात्मक प
Jalna, Jalna | May 5, 2026 मुंबईत सकारात्मक प्रतिसाद मुंबई येथे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांच्या दालनात जालना शहरातील विपश्यना केंद्र (भीम पार्क) उभारणीसंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. शिवसेना उपनेते तथा आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या संकल्पना व सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या प्रकल्पाला गती मिळाल्याचे बैठकीत स्पष्ट झाले. या बैठकीत जालना महानगरपालिकेच्या वतीने भीम पार्क प्रकल्पाचे सविस्तर सादरीकरण करण्यात आले. ध्यान, साधना आणि मानसिक शांततेसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या या प्रकल्पासाठी सुमारे