केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांची नागपूर येथे आ. करण देवतळे यांनी आज दि.21 ऑक्टोबर 12 वाजता सदिच्छा भेट घेऊन त्यांना दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. या भेटीत आ. करण देवतळे यांनी ववरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रातील सुरू असलेल्या विविध विकासकामांबाबत चर्चा झाली तसेच आगामी प्रकल्पांविषयी मार्गदर्शनही मिळाले. नितीनजींच्या विकासदृष्टिकोनातून प्रेरणा घेऊन जनसेवा आणि प्रगतीचा प्रवास अधिक वेगाने पुढे नेण्याचा संकल्प आ देवतळे यांनी पुनः दृढ केला.